शेतकरी पुत्रानं शेतात बनवलं मिनी हाऊस!

ग्रामीण भागात वन्य प्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी मचाण तयार केली जाते. 

शेतकऱ्यांनी लाकूड फाट्यापासून तयार केलेली मचाण पूर्णपणे सुरक्षित नसते. 

वर्ध्यातील शेतकऱ्याच्या मुलानं केलेला एक जुगाड सध्या चर्चेत आहे. 

कासरखेडा येथील शेतकरी पुत्र योगेश लिचडे यांनी अत्याधुनिक मचाण तयार केली आहे. 

ही अत्याधुनिक मचाण म्हणजे मिनी हाऊसच असून यात सोलर पॅनल बसवण्यात आलंय.

या मचाणमध्ये सोलरच्या माध्यमातून फॅन, फोन चार्जिंग, रेडिओ, प्रकाशाची सोय आहे. 

5 ते 6 फूट उंच आणि 550 किलो वजनाच्या या मचाणीत एकावेळी दोघेजण आरामात थांबू शकतात. 

योगेशने बनवलेल्या मचाणला झुला देखील तयार करण्यात आला आहे. 

सध्या या मचाणची पंचक्रोशित चर्चा असून लोक मचाण पाहण्यासाठी येत आहेत. 

शेतकऱ्यांना कमी खर्चात अत्याधुनिक मचाण बणवून देणार असल्याचं योगेशनं सांगितलं. 

गांधींच्या काळापासून 'वेस्ट' ते बेस्ट!

रंगावरून ब्लड लिली म्हणून ओळखली जाणारी ही फुलं 6 ते 7 दिवस राहतात. 

Click Here