नोकरी सोडली अन् लावली आमराई

महाराष्ट्रात अनेक उच्च शिक्षित तरुण शेतीकडे वळत आहेत. 

वर्धा जिल्ह्यातील अतुल कुरवाडे हे उच्च शिक्षण घेऊन खासगी कंपनीत नोकरी करत होते. 

कामात समाधान न मिळाल्याने नोकरी सोडून आधुनिक शेतीचा मार्ग निवडला.

कुरवाडे यांनी आष्टी तालुक्यातील तळेगाव येथे सेंद्रीय शेती सुरू केली. 

आपल्या वडिलोपार्जित पडीत शेतीत कुरवाडे यांनी आमराई फुलवली. 

2017 मध्ये कुरवाडे यांनी 5 एकर क्षेत्रात आंब्याची 1400 रोपे लावली.

यामध्ये केशर, हैद्राबादी हापूस, दशहरी, बैंगन फल्ली, गावरान आंब्याच्या प्रजाती आहेत. 

अवघ्या दोन वर्षातच 2019 मध्ये 350 झाडं बाहरली आणि 3.5 लाखांचं उत्पन्न मिळालं. 

आता संपूर्ण आमराई आंब्यांनी बहरली असून 7 लाखांचे उत्पन्न मिळण्याची आशा आहे. 

आधुनिक शेतीचा मार्ग पत्करत सुशिक्षित तरुणांनी कृषी क्षेत्राकडे वळावे, असे कुरवाडे सांगतात. 

52 जातीचे आंबे पाहिलेत का?

Click Here