आपण दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी सायकल हाताच्या साह्याने चालवताना बघितलं असेल.
मात्र दिव्यांगांसाठी असलेली ही तीन चाकी सायकल जर सौरऊर्जेवर चार्ज होऊन चालवता येत असेल तर?
वर्ध्यातील जय महाकाली शिक्षण संस्थेच्या अग्निहोत्री कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांची ही आयडिया आहे.
कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या 5 विद्यार्थ्यांनी मिळून अंतिम वर्षाच्या प्रोजेक्टसाठी ही सौर सायकल तयार केली.
प्रोजेक्ट दिव्यांगांसाठी होता आणि तो पर्यावरणपुरक असावा अशी सूचना देण्यात आली होती.
गौरव वानखेडे, समीर मेश्राम, रजनीश केदार, मजहर सैय्यद आणि अदिती कुमार यांनी प्रोजेक्टवर काम केले.
डिजाईन अँड फॅब्रिकेशन ऑफ सोलर हायब्रीड ट्रायसिकल असं प्रोजेक्टचं नाव ठरलं.
पेट्रोलच्या वाढत्या किमती बघता बॅटरीवर चालणारी ही सायकल पेट्रोलचा खर्च आणि प्रदूषण टाळणारी आहे.
सोलर सायकलचे वजन 40 ते 50 किलो असून सायकल जास्तीतजास्त 180 किलो वजन सहन करू शकते.
सोलर सायकल तयार करण्यासाठी जवळजवळ 20 हजारांचा खर्च आला असून त्यात दोन बॅटरीज आहेत.
वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दंगल गर्ल मैदानात!
Click Here