नुकताच दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात मुलींनी मोठं यश मिळवलंय.
वर्धा जिल्ह्यातील वर्धमनेरीच्या वेदांती गजानन सुकलकर हिनं तब्बल 96.60 टक्के गुण मिळवलेत.
मजुराची मुलगी असणाऱ्या वेदींतीनं जिद्द आणि कष्टाच्या बळावर जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावलाय.
वेदांती ही श्री सद्गुरु विद्यामंदिर वर्धमणेरी या शाळेची विद्यार्थिनी असून ती प्रत्येक उपक्रमात सहभागी असते.
विशेष म्हणजे वेदांतीला विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत.
तिला मराठी 92, टेक्निकल 94, इंग्रजी 94, गणित 95 आणि सामाजिक शास्त्रात 98 गुण मिळाले आहेत.
वेदांतीनं आठवी NMMS मध्ये यश मिळवलं तर पाचवीपासूनच विज्ञान प्रदर्शनात प्रथम आलीय.
भविष्यात एमबीबीएस करून यूपीएससीची तयारी करण्याची इच्छा वेदांतीने व्यक्त केलीय.
घरची परिस्थिती आणि लेकीचे यश आणि जिद्द बघून आई-वडिलांच्या डोळ्यातून अश्रू आले.
रोजमजुरी करणाऱ्या आई - वडिलांच्या कष्टाची जाण ठेवत लेकीनं मिळवलेल्या यशांचं कौतुक होतंय.
विद्यार्थ्यांनी वाचवली वनराई!
Click Here