अतिवृष्टीमुळे रस्त्यासह पूल गेला वाहून

गेल्या काही दिवसांत वर्धा जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. 

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून गाव खेड्यातील रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत. 

या रस्त्यावरून जाताना दुर्घटना घडू नये त्यामुळे प्रशासनाच्या वतीने वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

नागरिकांनी पाण्याच्या प्रवाहातून प्रवास करण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

वर्धा तालुक्यातील बेलगांव येथे पावसामुळे नदीवरील पुल पूर्णपणे वाहून गेला. 

हिंगणघाट तालुक्यातील आलमडोह ते अल्लीपूर मार्ग यशोदा नदी प्रवाहामुळे बंद पडला.

सेलू तालुक्यातील धानोली मेघे ते बेलगाव या गावांना जोडणाऱ्या पुलाच्या दोन्ही बाजूकडील भाग वाहून गेला. 

धानोली मेघे ते बेलगाव या मार्गाचा वापर मुख्यत्वे शेतकरी व मजूर करतात. 

वर्धा तालुक्यातील पवनार सेवाग्राम रोडवर नागझरी नाल्यावरील पुल पावसामुळे पूर्णपणे वाहून गेला. 

अनेक ठिकाणी सुरक्षेच्याकारणास्तव बॅरिगेट लावून वाहतूक बंद करण्यात आली आहे.

40 गावातील शेतीचं झालं तळं

Click Here