अटल टिंकरिंग प्रयोगशाळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअर घडविण्यासाठी उत्तम मार्ग ठरत आहे.
या शाळेत प्रवेश घेणारे विद्यार्थी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर घडवण्याचं स्वप्न बघत आहेत.
वर्ध्यातील आष्टीच्या लोकमान्य विद्यालयात 2019 पासून अटल टिंकरिंग प्रयोगशाळा कार्यरत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने या शाळेत प्रवेश घेत असून स्वतःचे मॉडेल बनवत आहेत.
दरवर्षी शेकडो विद्यार्थी वैज्ञानिक बनण्याचे स्वप्न साकार करत आहेत.
टिंकर फेस्टिवलमध्ये विद्यार्थी रोबोटिक्स, ड्रोन, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट सारख्या संकल्पना शिकत आहेत.
यातील यशस्वी विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्डसाठी निवड करण्यात येते.
विद्यालयात प्रत्येक वर्षातून दोन कार्यशाळांचे व एक टिंकर फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते.
आष्टी तालुक्यातील 17 शाळा या फेस्टिवलमध्ये आपले विद्यार्थी सहभागी करतात.
सध्या शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील 400 च्या वर विद्यार्थी या प्रयोगशाळेचा लाभ घेत आहेत.
Click Here