आजोबा रॉक्स, बाकी शॉक! 

ऐंशीपार व्यक्ती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काठीचा आधार घेऊन चालणारे आजोबा येतात. 

मात्र वर्धा येथील 84 वर्षीय आजोबांनी हा दृष्टिकोन साफ चुकीचा ठरवला आहे. 

एकेकाळी पोलीस सेवेत असणारे जानराव खुशालराव लोणकर यांनी वेगळंच उदाहरण घालून दिलंय.

लोणकर आजोबांनी विविध प्रकारच्या 26 ते 27 क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. 

देशविदेशातील विविध स्पर्धांमध्ये भाग घेत त्यांनी आतापर्यंत 114 पदके पटकावली आहेत. 

दौड स्पर्धा, भालाफेक, गोळाफेक, तबकडी फेक, जम्पिंग, ट्रिपल चेस्ट, हार्डर सारखे खेळ ते खेळतात. 

जानराव लोणकर हे वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी पोलीस खात्यात रुजू झाले होते.

 लवकर उठणे, व्यायाम करणे, वेळेत जेवणे, लवकर झोपणे, यासारख्या सवयी त्यांनी अंगिकारल्या आहेत. 

निरोगी आणि फिट आयुष्य जगण्याचे काही महत्त्वपूर्ण नियम आजोबा कटाक्षाने पाळतात. 

लोणकरे हे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अगदी तंदुरुस्त असून इतरांना प्रेरणा देत आहेत. 

बैलगाडी अपघातानं घडवला लेखक!

Click Here