अंगी जिद्द आणि कष्टाची तयारी असेल तर यशाला गवसणी घालण्यात वय सुद्धा अडथळा ठरू शकत नाही.
वर्ध्यातील 8 वर्षीय अर्णवी सागर राचर्लावार या चिमुकलीनं हेच दाखवून दिलं आहे.
अर्णवीनं सलग 3 तास 39 मिनिटं भरतनाट्यमचं सादरीकरण करून मोठा विक्रम केलाय.
चिमुकल्या अर्णवीच्या विक्रमामुळे वर्ध्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय.
सावंगी मेघे येथील दत्ता मेघे सभागृहात अर्णवीनं विक्रमी भरतनाट्यम नृत्य केलं.
पूर्वीचा 49 मिनिटांचा विक्रम मोडीत काढत अर्णवीनं 3 तास 39 मिनिटांचा नवा विक्रम आपल्या नावे केला.
अर्णवीच्या या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.
अर्णवी वयाच्या अवघ्या 3 वर्षांपासून भरतनाट्यम नृत्य प्रकारचे धडे गिरवतेय.
गेल्या 5 वर्षात तिनं विविध स्तरावर 137 परितोषिकं, पुरस्कार व बक्षिसं पटकावली आहेत.
अर्णवीनं लघुपट व अल्बममध्येही बालकलाकाराची भूमिका साकारली आहे.
विद्यार्थ्यांनी वाचवली वनराई!
Click Here