महाराष्ट्रातील अनेक बालकलाकार आपल्या नृत्य व संगित कलेनं प्रेक्षकांची मनं जिंकत असतात.
सोशल मीडियावरही या चिमुकल्यांचा बोलबाला असतो आणि त्यांना चाहत्यांचाही पाठिंबा मिळत असतो.
वर्धा जिल्ह्यातील असाच एक 14 वर्षीय चिमुकला आपल्या आवाजाच्या जादूनं अनेकांना मंत्रमुग्ध करतोय.
आर्ष सुरेशराव चावरे हा पालकांच्या पाठिंब्यामुळं शालेय शिक्षणासोबतच तो गायनही करतोय.
आर्षनं तीन वर्षांचा असताना एका शाळेत गाण्याचं सादरीकरण केलं अन् त्याचा संगीत प्रवास सुरू झाला.
आर्षनं बालपणापासूनच विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपल्या मधूर आवाजानं अनेक बक्षिसं जिंकली.
भविष्यात आर्षला सॉफ्टवेअर इंजिनिअर बनण्याची इच्छा असून गायन क्षेत्रात नाव कमवायचंय.
2019 ला आर्षला अनाथांच्या आई स्व. सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते माई पुरस्कार मिळाला.
2021 ला राज्यस्तरीय आदर्श बाल गौरव कलारत्न किड्स आचिव्हर्स पुरस्कारानं त्याला सन्मानित केलं.
संगीत क्षेत्रात आर्ष उत्तुंग भरारी घेईल अशी त्याच्या चाहत्यांची प्रार्थना आहे.
Click Here