भारतात प्रत्येक सण, उत्सव साजरा करण्यामागं शास्त्रीय कारणंही आहेत.
मात्र ते साजरे करताना काही चुकीच्या प्रथाही त्यासोबत जोडल्या गेल्या आहेत.
विशेषत: पती हयात असणाऱ्या स्त्रियांना सौभाग्यवती म्हणून धार्मिक कार्यक्रमांत मान असतो.
पतीचं निधन झालेल्या महिलांना विधवा म्हणून कोणत्याही कार्यक्रमात मान नसतो.
वटपौर्णिमेसारख्या सणातही या महिला सहभागी होऊ शकत नाहीत.
याला फाटा देत आज वर्ध्यातील सावित्रींनी क्रांतिकारी पाऊल टाकलं आहे.
पती निधनानंतर महिलांनी हळदी कुंकू लावत वडाची पूजा केली.
विशेष म्हणजे काही महिलांनी 30 ते 40 वर्षांनी पहिल्यांदाच कुंकू लावलं.
या सोहळ्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या वनिता चलाख आणि ज्योती देवतारे यांनी पुढाकार घेतला.
आगामी काळात सर्वजण एकत्र येऊन सण साजरे करणार असल्याचे या महिलांनी सांगितले.
Click Here