मुंबई-गोवा वंदे भारतचं किती आहे भाडं?
भारतीय रेल्वेतील सर्वात आधुनिक अशा वंदे भारत एक्स्प्रेसमधून कोकणातील नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे.
मुंबई ते मडगाव दरम्यानच्या वंदे भारत-एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (27 जून) रोजी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
मुंबई-गोवा वंदे भारत-एक्स्प्रेस ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटेल ती गोव्यातील मडगाव स्टेशनपर्यंत धावणार आहे.
या ट्रेनला आठ डब्बे असून 586 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी आठ तासांचा कालावधी लागणार आहे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या मार्गावरील अन्य फास्ट रेल्वेपेक्षा हा कालावधी 3- 4 तास कमी आहे, असा दावा रेल्वे प्रशासनानं केलाय.
आठवड्यातील सहा दिवस (शुक्रवारसोडून) ही रेल्वे धावणार आहे.
नॉन मान्सून आणि मान्सून या दोन कालावधीसाठी वंदे भारत एक्स्प्रेसचं वेगळं वेळापत्रक आहे.
नॉन मान्सून वेळापत्रक : मुंबईतील सीएसएमटीहून पहाटे 5 वाजून 35 मिनिटांनी ही रेल्वे सुटेल आणि दुपारी 1.15 मिनिटांनी मडगावला पोहचेल.
तर मडगावहून दुपारी 2.35 मिनिटांनी ही गाडी सुटणार असून रात्री 10.25 वाजता सीएसएमटीला पोहचेल.
मान्सून वेळापत्रक : दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पहाटे 05.25 वाजता सीएसएमटी मुंबईहून निघेल आणि मडगावला दुपारी 3.30 वाजता पोहोचेल.
तर मडगावहून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी 12.20 वाजता सुटेल आणि 22.25 वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल.
वंदे भारत ट्रेनचे रेल्वे भाडे हे वेगवेगळे असून सी डब्यांसाठी 1,100 रुपये ते 1,600 रुपये एवढं भाडं आकारण्यात येणार आहे.
तर एक्झिक्यूटिव्ह क्लास श्रेणी म्हणजेच प्रथम श्रेणी डब्यासाठी 2000 रुपये ते 2800 रुपये एवढे भाडे आकारण्यात येईल अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिलीय.
ही ट्रेन दादर, ठाणे, पनवेल , रोहा , खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम येथे थांबणार आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
चक्क शाळेनं सुरु केली बँक
Click Here