श्रावणात राशीनुसार पूजा ठरेल लाभदायक

श्रावण असतो महादेवाला समर्पित. शास्त्रात आहेत महादेवाला प्रसन्न करण्याचे अनेक मार्ग.

महादेवासाठी राशीनुसार विविध रंगांचे पूजा साहित्य वापरल्यास होतो प्रचंड लाभ.

पाहूया कोणत्या राशीसाठी कोणता रंग आहे शुभ:

मेष: लाल रंगाची फुलं पाण्यात किंवा कच्च्या दुधात मिसळून अभिषेक करावा.

वृषभ: दह्याचा अभिषेक करावा. शुभ्र चमेली अर्पण करावी.

मिथुन: हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून ऊसाच्या रसाचा अभिषेक करावा.

कर्क: हिरवी भांग आणि साखर मिसळलेल्या दुधाचा अभिषेक करावा.

सिंह: लाल चंदनाच्या पाण्याचा अभिषेक करावा.

कन्या: पंचाक्षरी मंत्राचा जप करत पाणी आणि पंचामृताचा अभिषेक करावा.

तूळ: दुधात गायीचं तूप आणि सुगंधी तेल मिसळून त्याचा अभिषेक करावा.

वृश्चिक: मध मिसळलेल्या पाण्याचा अभिषेक करावा. लाल गुलाब आणि बेलपत्र अर्पण करावं.

धनू: पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा करावी. कच्च्या दुधात केशर मिसळून अर्पण करावं.

मकर: काळ्या तिळाच्या तेलाचा अभिषेक करावा.

कुंभ: नारळ पाण्याचा, ऊसाच्या रसाचा किंवा पिवळ्या मोहरीच्या तेलाचा अभिषेक करावा.

मीन: पाण्यात भिजवलेल्या केशराचा अभिषेक करावा.