'ती' आली, तिने पाहिलं, 
जिंकून घेतलं सारं

उत्तर प्रदेशच्या झाँसीची लेक 4 वर्षांपूर्वी मुंबईत आली. मनोरंजन क्षेत्रात काम मिळवण्यासाठी तिने प्रचंड धडपड केली.

अखेर उन्नती पांडेला यश मिळालं. 'अजमेर 92' चित्रपटातून तिचं बॉलिवूड पदार्पण झालं.

उन्नतीचे वडील आहेत झाँसीतील नामवंत समाजसेवक. कोरोना काळात केली होती गरजवंतांना जेवण आणि औषधांची मदत. तर, आई आहे शिक्षिका.

'माझ्या मुलीचं मोठ्या पडद्यावर येणं, हे संपूर्ण झाँसीसाठी अभिमानास्पद' - उन्नतीचे वडील.

'तिला लहानपणापासूनच होतं स्टेजचं आकर्षण. आरशात उभी राहून करायची अभिनय' - उन्नतीची आई.

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या उन्नतीला लहानपणापासूनच होती डान्स, अभिनय आणि मिमिक्रीची आवड. कुटुंबियांकडून मिळालं पूर्ण प्रोत्साहन.

मॉडेलिंगपासून केली करियरची सुरुवात. काही म्युझिक अल्बममध्येही केलं काम. अखेर आता मिळाला मोठा ब्रेक.

चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या अजमेर 92मध्ये आहेत 3 प्रमुख भूमिका. त्यातील एक आहे उन्नती पांडे.

'क्लास ऑफ 2020' वेबसीरिजमध्येही झळकली होती उन्नती. 'चित्रपटात काम करण्याचं स्वप्न लहानपणापासून पाहिलं होतं. त्यासाठी खूप प्रयत्न करत होते. कुटुंबीयांनी प्रचंड प्रोत्साहित केलं', असं ती म्हणाली.