माणसांपेक्षाही धूमधडाक्यात श्वानांचं लग्न

नवी मुंबईतील सानपाडा मधील गुनीना लॉन या सोसायटीमध्ये रिओ आणि रिया या श्वानांचा विवाह सोहळा संपन्न झाला आहे.

निल भाटीया आणि राजेश सिधानी या कुटुंबाच्या श्वानांमध्ये हा विवाह सोहळा रंगला.

 रिओ आणि रिया एक वर्षांपासून मित्र असून त्यांच्या मालकांनी या दोघांचे मोठ्या थाटात लग्न लावून दिले. 

 ज्याप्रमाणे लग्नात मंगलअष्टक आणि अंतरपाट धरण्याला विशेष महत्त्व असते, तसे विधी या श्वानांच्या लग्नातही पार पडले. 

एवढंच नाही तर या लग्नासाठी त्यांनी शेजारील लोकांना निमंत्रित देखील केले होते आणि ते सर्वजण लग्नाला हजर होते. 

लग्न समारंभानंतर यावेळी दोन्ही परिवाराकडून वाजत-गाजत मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात यांची वरातदेखील काढण्यात आली.

रिओ आणि रिया या दोघांचं लग्न हे सर्व सामान्य माणसांचे होते. त्याच पद्धतीनें विधिवध करून दिलं आहे.

हळदी, मेहंदी, डान्स, सर्व प्रथा , पंडित मंगलाष्टका या टप्प्याने लग्न लावून देण्यात आलं आहे.

या सोहळ्यामुळे आम्ही सर्व आनंदी आहोत, असं भाविषा सिधानी यांनी सांगितलं.