अरेच्चा! 76 विद्यार्थी 'सेम टू सेम'
जगात 7 माणसं हुबेहूब सारखी दिसतात, असं गंमतीत म्हटलं जातं. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल की...
पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील पोलीस डीएव्ही शाळेत दोन नाही, चार नाही, तब्बल 76 विद्यार्थी दिसतात एकमेकांसारखे. हुबेहूब एकमेकांसारखे.
यामध्ये आहेत अनेक जुळे विद्यार्थी.
तीन सारख्या दिसणाऱ्या व्यक्तींचे गटही अनेक आहेत.
विद्यार्थी म्हणतात, सेम टू सेम दिसण्याने खूप गोंधळ होतो, कधी कधी फायदा होतो.
जसं की, चूक एक करतो आणि शिक्षा दुसऱ्यालाच भोगावी लागते.
आपण चुकीच्या व्यक्तीला शिक्षा केली, हे कळतं तेव्हा शिक्षकांनाही वाईट वाटतं.
शाळेतील सत्तरहून अधिक मुलांचे चेहरे एकमेकांशी जुळतात, हे कळताच मुख्याध्यापिकाही झाल्या हैराण.
त्यांनी शाळेचं नाव थेट लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं.