वर्ध्यात आहेत महात्मा गांधींच्या दुर्मीळ वस्तू!

जगात महात्मा गांधीजी आपल्या विचार, कार्य आणि तत्त्वामुळे प्रसिद्ध आहेत. 

आश्रमीय आणि सामूहिक जीवन पद्धतीचा अंगीकार बापूंनी केला होता.

गाधीजींनी सेवाग्राम आश्रमाची स्थापना करून रचनात्मक कार्यासह स्वातंत्र्य चळवळीचे कार्य याच आश्रमातून सुरू केले.

तब्बल बारा वर्षे सेवाग्राम आश्रमात राहून देशासाठी कार्य केल्याने या आश्रमाचे महत्त्व जगात आहे.

पर्यटक आश्रम परिसरातील वातावरण आणि शांतता यावर अधिक प्रभावित होतात. 

नव्या पिढीतील तरुण वर्गासाठी येथील स्मारके, कापूस ते कापड निर्मिती आणि आश्रमातील वातावरण अलौकिक अनुभूती देऊन जातात. 

गाधीजींच्या कार्याची प्रेरणा घेण्यासाठी व नव्या पिढींना वास्तवातील गांधीजी कळावे यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक व अभ्यासक सेवाग्राम आश्रमात भेटी देतात.