साधू बनण्यासाठी सोडली तब्बल 27 लाखांची नोकरी

महाराज धीरेंद्र वशिष्ट यांनी आपल्या घर-परिवाराचा त्याग करुन साधू बनण्याचा निर्णय घेतला. 

धीरेंद्र वशिष्ट यांनी सांगितले की, 36 वर्षाचे असताना त्यांनी साधू बनण्याचा निर्णय घेतला होता. 

याआधी ते, एका मल्टिनॅशनल कंपनीत वार्षिक 27 लाख रुपये पगाराची नोकरी करत होते. 

दरम्यान, 2013 मध्ये त्यांनी साधू बनण्यासाठी घर-परिवाराचा त्याग केला. 

मग ते 2016 मध्ये रामभद्राचार्य महाराज यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी त्यांना लखनऊला पुन्हा लक्ष्मणपुरी बनण्याचे लक्ष्य दिले. 

याच उद्देश्याने भगवान श्री लक्ष्मण आणि आई उर्मिला यांच्या मंदिराचे निर्माण लक्ष्मणपुरी धाममध्ये होत आहे. 

हे निर्माण श्री लक्ष्मणपीठ सेवा न्यासकडून केले जात आहे. 

मंदिराचे अर्धे काम पूर्ण झाले आहे आणि पुढच्या दोन वर्षात मंदिर तयार होऊन जाईल.

सध्या धीरेंद्र वसिष्ठ मंदिराच्या निर्माणामुळे चर्चेत आहेत.