सध्या जगभरात थायरॉईड या आजाराचे प्रमाण वाढले आहे.
भारतातही थायरॉईड रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.
महिलांमध्ये थायरॉईड या आजाराचे प्रमाण अधिक आहे.
महाराष्ट्रात मिशन थायरॉईड मोहीम सुरू करण्यात आली आहे.
सरकारी रुग्णालयात थायरॉईडची तपासणी व उपचार मोफत होणार आहेत.
गरोदर महिलांमध्ये थायरॉईड समस्या अधिक आढळते.
प्रसूतीनंतर पहिल्या 3 महिन्यांत ही समस्या 44.3% महिलांमध्ये आढळते.
आयोडीनची कमतरता आणि इतर कारणांनी थायरॉईड होतो.
मासिक पाळीच्या तक्रारी, वजन कमी होणे ही थायरॉईडची लक्षणे आहेत.
थायरॉइड विविध प्रकारचा असतो.
हायपोथायरॉइडिझम मध्ये वंध्यत्व, लठ्ठपणा असे त्रास जाणवतात.
थायरॉईड रुग्णांना दुग्धजन्य पदार्थ, लिंबूवर्गीय फळे खाणे गरजेचे असते.
थायरॉईड रुग्णांनी नियमित व्यायाम करणे गरजेचे असते.