या भाज्या विकून महिला शेतकरी बनली लखपती

राजस्थान राज्यातील डुंगरपूरच्या इंद्रखेत येथील महिला शेतकऱ्याने कमाल करुन दाखवली आहे. 

त्या एका वर्षात तीन वेळा उत्त्पन्न घेऊन दुप्पट नफा घेत आहेत.

मंजूळा असे या महिलेचे नाव आहे. त्या आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत.

महिला शेतकरी मंजूळा या वर्षभरात तीन प्रकारची शेती करतात.

पावसाळ्यात त्या पत्तागोबी, खिरा, वांगी, दुधीभोपळा, भेंडी आणि मुळ्याची शेती करतात.

7 बिघा शेती करत असल्याचे त्या सांगतात.

7 बिघा शेती करुन त्या वर्षभरात कमीत कमी 7 ते 8 लाखांचा भाजीपाला विकतात.

यासोबतच त्या गहू आणि मक्का पिकाचीही शेती करतात.

शेती कशी करावी, याबाबत मंजूळा यांनी यूट्यूबची मदत घेतली.