कोल्हापूरचा फेमस बासुंदी चहा
कोल्हापूरमधील एका महिलेचा चहा सध्या चांगलाच फेमस झाला आहे.
नारायणी बासुंदी चहा असं याचं नाव असून तो पिण्यासाठी इथं नेहमी मोठी गर्दी असते.
जयश्री राजेंद्र गवळी या हा गाडा चालवतात.
त्यांच्याकडे असणाऱ्या बासुंदी चहाची किंमत 10 रुपये आहे.
तर मसाले दुधाची किंमत 10, 20 आणि 30 रुपये इतकी आहे.
संध्याकाळी 4 ते रात्री 12 पर्यंत हा गाडा सुरू असतो.
या गाड्यावर मिळणाऱ्या चहाची आणि मसाले दुधाची चव चाखायला लोक लांबून येत असतात.
पत्ता :
नारायणी बासुंदी चहा, कोल्हापूर महानगरपालिकेच्या इमारती शेजारी, कोल्हापूर