‘इथं’ मिळतीय सेन्सर मशिनच्या मदतीनं पाणीपुरी!
गोल गप्पा किंवा शुद्ध मराठी भाषेत पाणीपुरी कुणाला नको असते.
वयोवृद्ध आजी आजोबांपासून ते चिमुरड्यांपर्यंत सर्वांचा पाणीपुरी हा आवडता पदार्थ आहे.
कधी-कधी अस्वच्छतेमुळे पाणीपुरी खाण्याचा मोह आपण टाळतो.
पण, आता तुम्हाला मन मारण्याची अजिबात गरज नाही.
कारण, ठाण्यातीलएका तरूणाने सेन्सर मशिनच्या मदतीनं पाणीपुरी सुरू केली आहे.
ठाण्यातील गोपाळ बस्तीकर या तरुणाने हातांचा वापर न करता सेन्सॉर मशिनच्या मदतीनं पाणीपुरीची विक्री सुरू केलीय.
हा भन्नाट प्रकार पाहण्यासाठी आणि त्याचबरोबर चवीला अप्रतीम असलेले गोलगप्पे खाण्यासाठी ठाणेकर गोपाळ यांच्या पाचपाखडीतील स्टॉलवर गर्दी करत आहेत.
बस्तीकर यांच्या स्टॉलवर रगडा पाणीपुरी 30, आलू पाणीपुरी 25 तर शेवपुरी आणि दहीपुरी 40 रुपयांना मिळते.
हा स्टॉल रोज संध्याकाळी 5 ते 9 सुरु असतो.