नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला असून अनेक विद्यार्थ्यांनी चांगलं यश संपादित केलंय.
सध्या सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं राज्यभर कौतुक होतंय.
ठाण्यातील विशाल कराड या विद्यार्थ्याची मात्र वेगळ्याच कारणासाठी चर्चा आहे.
विशालनं अनोखा पराक्रम केला असून त्याला सगळ्याच विषयात 35 गुण मिळाले आहेत.
विशालच्या या कामगिरीचं आई-वडिलांना भलतंच कौतुक असून त्यांनी त्याचं अभिनंदन केलंय.
विशालचे वडिल रिक्षा चालवतात तर आई अपंग असून घर सांभाळत मजुरीही करतात.
घरची परिस्थिती हालाकिची असताना मुलगा दहावी पास झाला यातच समाधान असल्याचं आई-वडिल सांगतात.
विशालच्या या यशानंतर खूप आनंद झाला असल्याचं आई ज्योती कराड सांगतात.
विशालनं त्याच्या आवडीच्या क्षेत्रात करियर करावं, आमचा त्याला पाठिंबा राहील, असं वडील अशोक कराड सांगतात.
विशालला भविष्यात चांगला अभ्यास करून कलेक्टर व्हायचाय, असं तो सांगतो.
मित्राचा फोन आला, शैलेश पोलीस झाला!
Click Here