‘इथं’ होतीय विद्यार्थ्यांची जडणघडण!

सिग्नलजवळ राहणारी मुले आपण अनेकदा रस्त्यावर काहीना काही वस्तू विकताना किंवा भीक मागताना पाहिली असतील. 

अर्थात त्यात लहान मुलांचा देखील समावेश असतो. यामुळे या मुलाच्या शिक्षणाचे काय हा प्रश्न उपस्थित होतो. 

यामुळे सिग्नलवर वस्तू विकणाऱ्या मुलांसाठी ठाण्यामध्ये सिग्नल शाळा सुरु करण्यात आलेली आहे. 

या शाळेत शिक्षणच नव्हे तर कुशल विद्यार्थी म्हणून या विद्यार्थ्यांनी शाळेतून बाहेर पडावे यासाठी समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महापालिका काम करत आहे. 

या शाळेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. 

 हे व्यावसायिक शिक्षण गोदरेज एरोस्पेस विभागाचे प्रमुख पद भूषविणारे सुरेंद्र वैद्य या मुलांना देत आहेत.