शेवपुरी सँडविच कधी खाल्लं का?
सँडविच म्हटलं की बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी सुटतं.
मात्र ठाण्यातील अशाच एका पाणीपुरी व सँडविचच्या स्टॉलवर सध्या सँडविच प्रेमींची जास्त गर्दी होताना दिसत आहे.
येथे मिळणारा युनिक सँडविच फ्युजन म्हणजेच शेवपुरी सँडविच हा ठाणे करांचा पसंतीस पडत आहे.
ठाण्याच्या जोशी बेडेकर शाळेच्या परिसरात असलेले आनंद फूड कॉर्नर हे सध्या आनंद प्रजापती हे चालवतात.
त्यांचे वडील गेले 18 वर्षांपासून या ठिकाणी पाणीपुरी विकण्याचा व्यवसाय करत आहेत.
या शेवपुरी सँडविचचे वैशिष्ट्य म्हणजेच ब्रेडवर बटर व पुदिना चटणी लावून त्यावर शेवपुरीची कडक पुरी ठेवली जाते.
त्यावर बटाटा व गोड तिखट पाणी घालून त्यावर शेव घातली जाते.
या सँडविचला ग्रील मशीन मध्ये टाकून त्याला मस्त खुसखुशीत ग्रील केले जाते व टोमॅटो केचप सोबत सर्व्ह केले जाते.
मुंबईकरांना मिळतेय अनोख्या मोमोजची मेजवानी!
Click Here