खडूला जिवंतपणा देणारा शिक्षक!
माध्यम कोणतेही असो, कलाकाराचे हात लागले की त्याचं सोने होतं.
3 इंचाच्या खडूवर व्यक्तिचित्र साकारून खडूला जिवंतपणा देण्याच काम या कलाकारानं केलं आहे.
पेशाने शिक्षक असलेल्या या कलावंताने आजपर्यंत अनेक युगपुरुष, देव, देवतांची शिल्पे बनविली आहेत.
अहमदनगर शहरातील कला शिक्षक अशोक डोळसे यांनी छोट्याशा खडू वर व्यक्तिचित्र रेखाटायला सुरुवात केली.
या कलेची आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील दखल घेण्यात आली आहे.
माध्यमिक विद्यालयात कला अध्यापन करणारे शिक्षक अशोक डोळसे यांच्या कलेचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.
छंद म्हणून शिक्षकानं चित्रकला जोपासली. तोच त्यांचा पेशा बनला. त्यांच्या कलेला आजवर अनेक पुरस्कार मिळाली आहेत.