पुण्यात मिळतोय भन्नाट तंदूर वडापाव
आतापर्यंत तुम्ही वडापावचे विविध प्रकार बघितले असतील आणि खाल्ले सुद्धा असतील.
पुण्यामध्ये सध्या वडापाव मध्ये एक नवीन फ्युजन आलेला आहे. तो म्हणजे तंदूर वडापाव.
शिवतीर्थ वडापावचे मालक प्रतीक इंदुलकर यांनी हा तंदूर वडापाव पहिल्यांदा सुरू केला आहे.
या वडापावसाठी लागणारे कोटिंगचं बेसन वेगळं वापरतो. या बेसनात आम्ही तंदूर मसाले घालतो. स्पेशल तंदूर मसाले आम्ही स्वतः बनवतो.
वडापावचे सारण नॉर्मल वडापावच असतं. हा वडापाव आम्ही तळून झाल्यावरती त्याच्या पावाला तंदूरची चटणी मायोनीज टाकतो.
तंदूरच्या भट्टीमध्ये आम्ही बटर लावून हा वडापाव तंदूर करून ग्राहकांना देतो, असं प्रतीक इंदुलकर यांनी सांगितलं.
कुठे खाल शिवतीर्थ वडापाव?
अखिल शिवतीर्थ नगर कॉलनी, कोथरूड, पुणे
मुंबईकरांना मिळतेय अनोख्या मोमोजची मेजवानी!
Click Here