दिव्यांगांना स्वावलंबी करणारे स्वाधार केंद्र!
आणखी पाहा...!
दिव्यांगांना जगण्यासाठी कुणाच्यातरी आधाराची गरज असते.
स्वावलंबी जगण्याचा मंत्र मिळाला तर त्यांना जगण्याची नवी उमेद मिळू शकते.
लातूर जिल्ह्यातील बुधोडा येथे स्वाधार अंध अपंग पुनर्वसन केंद्र आहे.
हरिश्चंद्र सुडे हे 40 वर्षांपासून अंध, अपंगांचे जीवन प्रकाशमय करत आहेत.
स्वाधार केंद्रातून दिव्यांगांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवले जाते.
स्वाधार संस्था दिव्यांगांच्या रोजगार आणि लग्नासाठी काम करते.
अंगभूत कौशल्यांचा सर्वांगीन विकासासाठी शिक्षण दिले जाते.
स्पर्शज्ञानाचे रुपांतर व्यावसायिक कौशल्यात केले जाते.
दिव्यांगांना ॲक्युप्रेशर व मसाज चिकित्सा प्रशिक्षण दिले आहे.
दिव्यांग महिलांना फॅशन डिझाईनचे प्रशिक्षण दिले जाते.
पुनर्वसनाची संकल्पना राबविणारे महाराष्ट्रातील स्वाधार हे एकमेव केंद्र आहे.