उन्हाळ्यात जवळ बाळगावा कांदा! 

सध्या सर्वत्र उन्हाचा तडाखा वाढत असून पारा चढल्याने लोक हैराण झाले आहेत. 

वाढत्या उन्हामुळे होणाऱ्या असह्य वेदना लक्ष्यात घेता नाना तऱ्हाचे उपाय योजले जातात. 

उन्हाळ्यात खिशात कांदा बाळगण्याचा सल्ला  देखील अनेक लोक देत असतात. 

या मागील शास्त्रशुद्ध कारण अनेकांना माहिती नसून ते आयुर्वेदात विषद केलं आहे.

पाणी धरून ठेवणं हा कांद्याचा गुणधर्म असून त्यात पाण्याचा अंश जास्त प्रमाणात असतो. 

उन्हात त्वरित उपयोगात आणलं जाऊ शकणारं औषधी द्रव्य म्हणून कांद्याचा वापर करता येऊ शकतो.

उष्णतेमुळे नाक फुटण्याचा त्रास जाणवल्यास कांद्याचे दोन थेंब सोडल्यास रक्तस्राव थांबतो. 

कांद्यात मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी6 आदी जीवनावश्यक घटक असतात.

कांद्याच्या भूक वाढवण्याच्या गुणामुळे उष्ण ऋतूत भूक वाढण्यास मदत होते. 

कांदा नियमित खाल्ल्यास पचनक्रिया सुरळीत राहते, अशी माहिती आयुर्वेदिक चिकित्सक स्वानंद जोशी यांनी दिली.

मुंबईतील 5 बेस्ट जुगाडी वडापाव!

Click Here