लातूरमधील तरुणाने पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिली आहे.
अक्षय बनसोडे यांचा पारंपरिक जोडे बनवून विकण्याचा व्यवसाय आहे.
1964 मध्ये अक्षय यांच्या आजोबांनी जोडे बनवण्यास सुरुवात केली.
अक्षय यांनी परंपरागत व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिली आहे.
चपला, बुट, लेदर बेल्ट, लेदर जॅकेट, लेदर बॅग बनवण्यास सुरुवात केली.
बनसोडे यांनी लातूरमध्ये बनवलेल्या कोल्हापुरी चप्पलला मोठी मागणी आहे.
लातुरी चप्पल म्हणून स्वत:चा वेगळा ब्रँड तयार केला आहे.
बनसोडे यांच्या व्यवसायातून अनेकांना रोजगार मिळाला आहे.
बनसोडे यांच्याकडे सध्या 40 जण काम करत आहेत.
बनसोडे चपला, बूट, बॅग यांना लातूरसह महाराष्ट्रभर मागणी आहे.
बनसोडे यांच्या चपला, बूट कर्नाटक, आंध्रप्रदेश येथेही एक्सपोर्ट होत आहेत.
लातूरमधील चपलांच्या 'बनसोडे ब्रँड'चा मोठा चाहतावर्ग आहे.