उन्हाळा म्हटलं की आंबा आलाच. हापूसची चव चाखल्याशिवाय आंब्याचा सीझन साजरा होऊच शकत नाही.
यामुळे मुंबई आणि ठाण्यातील लोकांना कोकणातल्या हापूस आंब्याची चव चाखता यावी यासाठी सुहास निंबकर आंबा उपलब्ध करून दिलेला आहे.
आईनं पाठवलेल्या आंब्याच्या एका पेटी पासून सुरू केलेला सुहास निंबकर यांचा आंब्याचा व्यवसाय आता चांगलाच नावारूपाला आला आहे.
या ठिकाणी मुंबई आणि ठाण्यातील लोक आंबे खरेदीसाठी गर्दी करत असतात.
1977-78 च्या वेळी सुहास निंबकर हे रत्नागिरी येथून शिक्षण आणि नोकरी करीत मुंबईत आले.
काम करत असताना पैश्याची अडचण निर्माण झाल्याने आणखी काही तरी करण्याची गरज भासली.
त्याच वेळी 1980 च्या सुमारास सुहास यांच्या आईनं आंब्याची एक पेटी सुहास यांना मुंबईला पाठवली.
गावावरून मुंबईला आलेले आंबे सुहास यांनी मित्र मंडळी, नातेवाईक, कामाच्या ठिकाणी वाटले.
त्या आंब्याचे त्यांना पैसे मिळाले आणि सुहास यांना कल्पना सुचली ती आंबे विक्रीच्या व्यवसायाची.
आणि तिथून निंबकर बंधू हापूसवाले या नावाने व्यवसाय सुरू झाला.
आज निंबकर हे ठाण्यातील गोखले रोड येथे तीन ते चार महिने व्यवसाय करून चार ते पाच हजार आंब्याच्या पेट्या विक्री करतात.
यामधून त्यांना लाखोंची कमाई होते.
बीडमधील 'ही' 5 ठिकाणे नक्की पाहा!
Click Here