इंजिनिअर तरुण पोहे व्यवसायातून बनला करोडपती!
नागपूरच्या उच्चशिक्षित तरुणांनी चाकोरीबद्ध आयुष्यात न गुंतता त्यांनी पोह्यांच्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे या व्यवसायातून ते करोडपती झाले आहेत.
चाहूल बालपांडे एमबीए असून पवन वाडीभस्मेनं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं होतं.
दोघांनी पोहेवाला हा ब्रँड तयार केलाय.
नागपूरकरांची पोहे ही आवडती डिश आहे. त्यामुळे त्यांनी पोहे व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.
उत्तम ब्रँडिंग, मार्केटिंग आणि गुणवत्तेसह नाविन्यतेच्या जोरावर त्यांचा हा व्यवसाय यशस्वी झाला आहे.
आम्ही योग्य नियोजन करून सुरुवात केली.
त्यामुळे बघता बघता आमच्या या संकल्पनेला भरभरून प्रतिसाद आणि प्रेम मिळाले, असे चाहूल यांनी सांगितले.
नागपूर स्पेशल तर्री पोहे, चिवडा पोहा, मिसळ पोहा असे एकूण 13 प्रकारचे पोहे इथं एकाच छताखाली मिळतात.
एका कढई पासून सुरू झालेला हा प्रवास आज नागपूरहून महाराष्ट्रात आणि परराज्यातही पोहोचला आहे.