सव्वा 2 एकरात 65 क्विंटल कापसाचं  उत्पादन!

एकीकडे वातावरणाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान होऊन मशागत खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे.

मात्र, जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने सव्वा 2 एकरात तब्बल 65 क्विंटल कापसाचे विक्रमी उत्पादन घेण्याची किमया साधली आहे. 

जालना तालुक्यातील दाहिफळ गावचे शेतकरी विठ्ठल काळे यांनी ही किमया साधली आहे. 

सुरुवातीला 40 आणि नंतर 25 असा एकूण 65 क्विंटल कापूस विठ्ठल काळे यांना झाला आहे.

विठ्ठल काळे यांनी इतर शेतकरी करतात त्याप्रमाणेच लागवड पूर्व मशागत केली.

यामध्ये शेताची खोल नांगरणी करून एकरी दोन ट्रॉली शेणखत टाकले. 

त्यानंतर रोटर मारून जमीन साफ करून घेतली. बसंत आणि नवनीत या दोन वाणांची निवड केली. 

गेल्या वर्षी 15 जून रोजी चांगल्या पावसानंतर 4.5 बाय दीड फुटावर लागवड केली. त्यानंतर त्यांनी कपाशीला खताचे तीन डोस दिले. 

यामध्ये सुरुवातीला 20-20-00-13 नंतर डीएपी आणि शेवटी प्लांटो अशा प्रकारे खते दिले.

 डिसेंबर अखेर त्यांना 40 क्विंटल कापूस झाला. त्यानंतर त्यांनी फरदड कापसाचे नियोजन सुरू केलं.

 सुरुवातीचा 40 आणि फरदड 25 असा एकूण 65 क्विंटल कापूस झाला.

मुंबईतील 5 बेस्ट जुगाडी वडापाव!

Click Here