छोट्या शेतकऱ्यांनी माळावर फुलवली शेती!

आणखी पाहा...!

शालेय मुलांना सर्वांगिण शिक्षण देण्याची गरज असते. 

ग्रामीण भागातील बहुतांश शाळकरी मुले ही शेतकरी कुटुंबातील असतात.

मुलांना शाळेत आधुनिक शेतीचे धडे मिळावेत यासाठी प्रयत्न केले जातात. 

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शाळांत विविध उपक्रम राबविले जातात.

नांदूर खंदरमाळ येथील लहूचा मळा शाळा उपक्रमशिल आहे. 

शाळेतील विद्यार्थ्यांनी खडकाळ जमिनीवर परसबाग फुलवली आहे. 

विद्यार्थ्यांनी पिकवलेल्या भाजीपाल्याचा वापर रोजच्या आहारात होतो. 

या प्रयोगाने विद्यार्थ्यांना शेतीची आवड निर्माण झाली आहे. 

पंतप्रधान पोषणशक्ती योजना परसबाग स्पर्धेत शाळेचा जिल्ह्यात दुसरा क्रमांक आला

शाळेत रोहिदास गाडेकर व आशा गाडेकर हे शिक्षक दाम्पत्य कार्यरत आहे. 

परसबाग उपक्रमासाठी विद्यार्थी व पालकांचेही सहकार्य लाभले आहे.

शाळेचच्या परसबाग आणि इतर उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.