चक्क मराठी शाळेतील मुलं बोलतायंत जपानी!

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळा गुणवत्तेच्या बाबतीत सध्या आघाडीवर आहेत. 

सातारा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. 

माण तालुक्यातील विजयनगर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी चक्क जपानी भाषेत बोलत आहेत. 

या एक शिक्षकी शाळेतील बालाजी जाधव हे उपक्रमशील शिक्षक आहेत. 

शिक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 1 ली ते 4 थीच्या वर्गातील 40 विद्यार्थी जपानी भाषा शिकत आहेत. 

जपानी भाषेची प्राथमिक ओळख झाल्याने छोटी-छोटी वाक्ये तयार करून ते बोलूही शकतात. 

विद्यार्थ्यांना जपानी शिकवण्यासाठी भाषिक अॅप आणि युट्युबसारख्या साधनांचा ते वापर करतात. 

मातृभाषेसोबतच परदेशी भाषा शिकताना विद्यार्थ्यांनाही त्याची आवड निर्माण झाली आहे. 

विद्यार्थी जपानी भाषेत संवाद, वाचन, लेखन, गणित यामध्ये तरबेज झाले आहेत. 

ऐकणे, पाहणे, वाचणे, लिहणे, बोलणे या मार्गातून विद्यार्थी जपानी भाषा शिकत आहेत. 

विद्यार्थी जपानीत प्राणी, पक्षी, वार, महिने आणि पर्यावरणातील इतर घटकांची नावे सांगत आहेत. 

जपानी भाषेची प्राथमिक ओळख झाल्याने छोटी-छोटी वाक्ये तयार करून ते बोलूही शकतात. 

एखादा जपानी व्यक्ती बोलू लागला तर विद्यार्थ्यांना समजू शकते, असे शिक्षक सांगतात. 

शिक्षक जाधव यांच्या विद्यार्थ्यांना जपानी शिकवण्याचे पालकांकडूनही स्वागत होत आहे.