बीडमधील जिल्हा परिषदेच्या शाळा विद्यार्थी केंद्रीत शिक्षणासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात.
त्यामुळे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविले जातात.
जिल्ह्यातील उमरद खालसा येथील जिल्हा परिषद शाळेतही सातत्याने अभिनव उपक्रम राबविले जातात.
उमरद खालसाच्या शाळेतील शैक्षणिक उपक्रमांची चर्चा जिल्हाभर होत असते.
यावेळी शाळेत Hands on Activities या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमात विद्यार्थ्यांकडून छोटे छोटे वैज्ञानिक प्रयोग करून घेण्यात आले.
शाळेतील सर्व विद्यार्थी उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाले होते.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी कागदापासून बनवलेली ब्रेन कॅप सर्वात आकर्षक ठरली.
ही ब्रेन कॅप बनवण्यासाठी जाड रंगीत कागद, कात्री, फेविकॉल यांचा वापर करण्यात आला.
विद्यार्थ्यांना मानवी मेंदू आणि त्यातील भाग, त्यांची वैज्ञानिक नावे यांची माहिती या कॅपमुळे मिळते.