सफाई कर्मचाऱ्याची मुलगी निघाली इस्रोला

जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची‎ श्रीहरिकोटा येथे सहल‎ काढण्यात येणार आहे. 

यासाठी जिल्ह्यात केंद्रांतर्गत इयत्ता 5 वी ते 8 वी वर्गात शिकणाऱ्या जिल्हा परिषदच्या शाळांतील सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. 

यामध्ये जिल्ह्यातील 24 विद्यार्थ्यांची श्रीहरिकोटा येथील शैक्षणिक सहलीसाठी निवड झाली आहे. 

यामध्ये मानेगाव येथील जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थिनी कल्याणी जाधव हीची देखील निवड झाली आहे. 

कल्यानीची आई शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करते. 

कल्याणी या सहलीमुळे पहिल्यांदाच विमान प्रवास करणार आहे. 

या सहलीमुळे विद्यार्थ्यांना अंतरिक्ष केंद्र श्रीहरीकोटा आंध्र प्रदेश येथे उपग्रह प्रक्षेपणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.