अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान!

वर्धा जिल्ह्यात आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे.

रब्बी हंगामातील हरभरा, गहु पीके काढणीला आली असून उन्हाळी पिकेही धोक्यात आली आहेत.

हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती.

जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी विजेच्या गडगडाटसह सोसाट्याचा वादळी वारा आला.

वारा आणि अवकाळी पावसाने परिसरातील शेती पिकांना मोठा फटका बसला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

मृग बहाराचा संत्रा तोडणीला आला आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांची संत्रा बाग विकली नाही.

वादळी वाऱ्याने संत्रा जमीनदोस्त झाला आहे.

अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा आणि भाजीपाला उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.

वादळी वारा आणि अवाकाळी पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे.