जमिनीवर बसून पुरणपोळीच जेवण, हॉटेलात मिळतो पंगतीचा आनंद
घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार घरी गोडधोड जेवण बनवून केला जातो.
महाराष्ट्रात पाहुणचार करण्याची प्राचीन परंपरा आहे.
घरी आलेल्या पाहुण्यांसाठी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो.
सध्याच्या धावपळीत अनेकांना स्वयंपाक बनवणे शक्य होत नाही. यासाठी हॉटेलात देखील पुरणपोळीचं जेवण उपलब्ध झालं आहे.
वर्धा शहरातील बॅचलर रोड आर्वी नाका येथील वरदा वर्धनी हाटमध्ये स्वादिष्ट असा पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो.
पुरणपोळी, खवा पोळी त्यासोबतच अंबाडीची कढी, साधी कढी, पापड, लोणची मसाले भात, साधा भात, नामदेव राईस, वांग्याची भाजी, पत्ता गोबीची भाजी, बेसन झुणका असा मोठा मेनू उपलब्ध आहे.
शहरातील अनेक नागरिक आपल्या पाहुण्यांना या हॉटेलात जेवण्यासाठी आणत आहेत.