ZP च्या पोरांनी नाव काढलं!

 नुकतेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत.

यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील फुल चिंचोली या गावातील 10 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. 

तर मराठा व कुणबी संवर्गातील छत्रपती राजाराम महाराज सारथी योजने अंतर्गत 2 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. 

यामुळे या गावातील लोकांनी डोक्यावर फेटा बांधून डीजेच्या ठेक्यावर त्यांची जंगी मिरवणूक काढली होती. 

फुल चिंचोली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील इयत्ता आठवी आणि दहावीतील विद्यार्थ्यांनी उत्तुंग असे यश मिळवले आहे.

 जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील इयत्ता आठवीतील 10 विद्यार्थी NMMS शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. 

त्यांना प्रत्येकी 60000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. 

व सारथी शिष्यवृत्तीस दहावीचे 2 विद्यार्थी पात्र झाले असून यांना प्रत्येकी 38400 रुपये मिळणार आहेत.

जालन्याच्या मुलीनं रचला इतिहास

Click Here