साप पकडला अन् मिळाली भन्नाट माहिती!

साप आणि नाग या सरपटणाऱ्या प्राण्याबाबत मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. त्यांना पाहिल्यानंतर अनेकांची भीतीनं घाबरगुंडी उडते. 

 हे गैरसमज दूर करण्याचं काम सर्पमित्र करत असतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे आता या विषयातही जागृती वाढतीय.

सोलापूर जिल्ह्यातले सर्पमित्र राहुल शिंदे यांनी या विषयावर काम करत असतानाच एक नवं संशोधन केलंय.

त्याची नोंद अमेरिकेतील प्रतिष्ठित जर्नलमध्ये झाली आहे.

साप आढळल्यानंतर अनेक जण राहुल यांना फोन करतात. त्यानंतर राहुल आणि त्यांची टीम येऊन सापाला सुरक्षितपणे बाहेर काढते. 

हे काम करत असतानच राहुल यांना एकदा खवले नसलेला साप आढळला. 

 हा नेहमीचा साप नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी या विषयावर संशोधन केले.

महाराष्ट्रात सापडणाऱ्या नागांवर खवले असतात. पण, सोलापूरमध्ये आम्हाला सापडलेल्या नागावर खवले नव्हते.

ही सामान्य बाब नसल्याचं माझ्या लक्षात आलं. मी त्या विषयावर संशोधन करत रिसर्च पेपर सादर केलाय.

अमेरिकेतील रेप्टाईल्स अँड ऑफिबीयन्स या जर्नलमध्ये हा रिसर्च पेपर प्रसिद्ध झालाय.

खवले नसलेल्या नागावरील हा जगातला पहिलाच रिसर्च पेपर आहे, असा दावा राहुल यांनी केला आहे.