ग्रामीण भागात वाढली रिल्सची क्रेझ! सोशल मीडियाचा वापर ठरतोय जीवघेणा
कोरोना महामारीनंतर सोशल मीडियाचा वापर अनेक पटींनी वाढला आहे. डिजिटल युगाचा आपल्या आरोग्यावर तसेच आपल्या जीवनावर मोठा परिणाम होत आहे.
कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लागू झाल्याने लोकांचा सोशल मीडियाकडे अधिक कल वाढला आहे.
सोशल मिडियाच्या अतिवापरातून अनेकजण नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलत आहेत.
बीड सारख्या ग्रामीण भागामध्ये देखील रिल्स तयार करण्यामध्ये तरुणाई गुरफटून गेली आहे.
काही तरुण दिवस रात्र रिल्स बनवणे आणि रिल्स पाहण्यामध्ये वेळ वाया घालत आहेत.
एखादी रिल्स पाहिली की त्यापुढील रिल्स पाहण्याची इच्छा होती यातून तासंतासाचा वेळ वाया जातो.
सोशल मिडियाच्या या अशा वापरातून लाईक्स कमी मिळाल्या तर नैराश्य वाढत आहे.
सोशल मिडियाचा वापर जरा जपून करणे आवश्यक बनलं असल्याच बीडमधील मानसोपचारतज्ञ, मोहम्मद मुजाहिद यांनी सांगितले.