..तर स्विमिंग पुलमध्ये डुबकी धोकादायक!

उन्हाळी सुट्ट्या लागल्या की बच्चे कंपनीला पोहायला शिकवण्याकडं पालकांचा कल असतो. 

ग्रामीण भागात विहीर, तलाव, नदीमध्ये मुलांना पोहण्याचे धडे दिले जातात. 

शहरात मात्र एखाद्या जलतरण तलावात मुलांना पोहण्याचे क्लास लावले जातात. 

स्विमिंगचा क्लास लावताना काही महत्त्वपूर्ण गोष्टींकडं आवर्जून लक्ष द्यायला हवं.

जलतरण तलावाच्या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र आहे की नाही हे तपासलं पाहिजे. 

आपण पोहायला शिकण्यासाठी निवडलेला जलतरण तलाव प्रमाणित आहे का हे तपासावं. 

सर्व नियमांचं पालन करत जलतरणपटूंनी पोहण्यापूर्वी व पोहून झाल्यानंतर शॉवर खाली अंघोळ करावी. 

पाण्यात उतरताना कुठलेही बॉडी लोशन, ऑईल, क्रिम आदी गोष्टींचा वापर टाळवा.

जलतरणासाठीची कपडे, डोक्यात टोपी, चष्मा इत्यादींचा वापर केला पाहिजे.

पोहणे हा केवळ क्रीडा प्रकार नसून शारीरिक, मानसिक आणि प्रसंगी आत्मसंरक्षणाचा भाग आहे

केरळचा शिवभक्त हमरास!

Click Here