रेशीम मार्केटमध्ये शेतकऱ्यांची चांदी!

सध्याच्या आर्थिक वर्षात जालनाच्या रेशीम बाजारात तब्बल 38 कोटींची उलाढाल झाली आहे.

तर तब्बल 418 क्विंटल रेशीम कोषांची विक्री झाली आहे.

21 एप्रिल 2018 मध्ये राज्यातील पहिली रेशीम बाजार पेठ जालन्यात सुरु झाली. 

सध्या या रेशीम मार्केटमध्ये रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा बोलबाला आहे.

मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र, विदर्भासह शेजारच्या गुजरातमधील शेतरकरी देखील इथं रेशीम विक्रीसाठी येत आहेत.

या मार्केटमध्ये शेतकऱ्यांना सरासरी 500 रुपये प्रतिकिलो एवढा भाव मिळतोय.

मागील महिन्यात 760 रुपये किलो इतका उच्चांकी भाव होता. 

 रोज सरासरी 3 टन कोशांची बाजारात आवक होत आहे. 

रेशीम मार्केट सुरू झाल्यापासून आर्थिक उलाढालीचा आलेख दरवर्षी वाढताना पाहयला मिळतोय.