सोलापूरमध्ये जानेवारीत दिवाळी

सोलापूरमध्ये पाच दिवस चालणाऱ्या सिद्धरामेश्वर यात्रेचा चौथा दिवस सोमवारी झाला.

चौथ्या दिवशी शोभेचे दारूकाम हे मुख्य आकर्षण असते. 

दोन वर्षांनी झालेल्या या दारूकामामुळे सोलापूरकरांनी जानेवारी महिन्यात दिवाळी अनुभवली. 

कोरोना महामारीच्या संकटापासून सर्वांनी कशी काळजी घ्यावी, तसंच कोरोना प्रतिबंधात्मक घोषणवाक्य हे या दारूकामाचे मुख्य आकर्षण होतं.

त्याचबरोबर अत्यंत सुंदर असा लेझर शो देखील यावेळी प्रेक्षकांना दाखवण्यात आला.

 श्री सिद्धेश्वर महाराजांचे सोलापूरसाठी असलेले कार्य आणि विविध ठिकाणी त्यांनी केलेली प्रबोधनात्मक कामे या लेझर शोच्या माध्यमातून दाखवण्यात आली.

विद्युत रोषणाईचा माध्यमातून सिद्धेश्वर मंदिराचा संपूर्ण परिसर यावेळी प्रकाशित झाला होता.