21 हजार सूर्यफुलांनी सजला दगडूशेठ गणपती!

चैत्र महिन्यात वसंत ऋतू मध्ये विविध फुलांना बहर येत असतो. 

त्यातीलच एक असलेल्या सूर्यफुलांचा अभिषेक पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला करण्यात आला.

मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत तब्बल 21 हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली होती.

ही फुले दिसायला खूप आकर्षक असून शेतातून काढल्यानंतर 7-8 दिवस पाण्यामध्ये व्यवस्थित राहतात.

मंदिराच्या कळसावर लावण्यात आलेल्या फुलांवर पडलेल्या सूर्यप्रकाशामुळे ही फुले अधिकच उठून दिसत होती. 

दगडूशेठ गणपतीचे हे मनोहर रुप पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सकाटा सीड इंडिया प्रा.लि. कंपनीच्या वतीनं ही आरास करण्यात आली आहे.