तांदळाच्या दाण्यांपासून साकारले छत्रपती शिवाजी महाराज !
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक भारतीयाचं दैवत आहे.
प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीला महाराज नेहमी प्रेरणा देतात.
आज (10 मार्च) रोजी संपूर्ण देशभरात तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात येत आहे.
त्यानिमित्तानं शिवाजी महाराजांचा प्रत्येक भक्त त्यांना आपल्या पद्धतीनं आदरांजली अर्पण करतो.
मुंबईतील एका तरुणानंही कलेच्या माध्यमातून महाराजांना मुजरा केला आहे.
त्यानं चक्क तांदळाच्या दाण्याचा वापर करत ही कलाकृती साकारली आहे.
मुंबईतील मालाड मालवणी परिसरात राहणाऱ्या विवेक वाघ ही कलाकृती साकारली आहे.
4 किलो तांदळापासून तब्बल 50 तासात छत्रपती शिवाजी महाराजांची 4×4 या आकाराची कलाकृती साकारली आहे.