शिवरायांच्या मावळ्यांसाठी दीपोत्सव!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला यंदा 350 वर्ष पूर्ण होत आहेत. 

राज्याभिषेकानंतर 6 जून 1674 रोजी किल्ले रायगडावर शिवाजी महाराज छत्रपती झाले.

किल्ले रायगड नंतर शिवराज्याभिषेकाचा नेत्रदीपक सोहळा नागपुरात साजरा केला जातो.

शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 

नागपुरात 3500 हजार दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात आला.

ज्ञात-अज्ञात मावळ्यांना दीपोत्सवाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले. 

नागपुरातील महाल भागात असलेल्या शिवतीर्थ येथे हा दीपोत्सव संपन्न झाला. 

या प्रसंगी भव्य अशी किल्ले रायगडची हुबेहुब प्रतिकृत्ती तयार करण्यात आली आहे. 

कार्यक्रमाच्या सुरवातीला आई भवानीचा जागरण गोंधळ घालून देव देवतांना आवतनं देण्यात आलं. 

या कार्यक्रमाला शेकडोंच्या संख्येने शिवप्रेमी, नागपूरकर उपस्थित होते. 

केरळचा शिवभक्त हमरास!

Click Here