शिवजयंतीनिमित्त 'इथं' करा आकर्षक मूर्तींची खरेदी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी रोजी जयंती आहे.
त्यामुळे सर्वत्र शिवजयंतीची जोरदार तयारी सुरू आहे.
विविध मंडळाच्या माध्यमातून शिवसृष्टी साकारण्याचं काम सुरू आहे.
नाशिकचे प्रसिद्ध मूर्तिकार आनंद सोनवणे आणि विवेक सोनवणे या दोघा भावांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध मूर्ती साकारल्या आहेत.
नाशिकमध्ये वास्तुशिल्प आर्ट स्टुडिओमध्ये या मूर्ती साकारण्यात आल्या आहेत.
100 रुपयांपासून तर तब्बल 10 लाख रुपयांपर्यंत या ठिकाणी मूर्ती विक्रीसाठी असून त्यांना शिवप्रेमींकडून मोठी मागणी आहे.
या वास्तुशिल्प आर्ट स्टुडिओमध्ये तुम्हाला हवी तशी मूर्ती या ठिकाणी बनवून मिळते.
पितळ, फायबर, शाडू माती अशा विविध वस्तूंपासून मूर्ती साकारल्या जातात, अशी माहिती आनंद सोनवणे यांनी दिली आहे.