छोट्या शेतकऱ्यांची शेतीशाळा!

आणखी पाहा...!

भारत हा खेड्यांचा देश असून शेतीप्रधान आहे. 

देशातील बहुसंख्य लोकसंख्या शेतीशी निगडीत आहे. 

शाळांमध्ये जवळपास 75 टक्के विद्यार्थ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी शेतकरी असते. 

विद्यार्थ्यांना गोडी लागावी म्हणून शालेय अभ्यासक्रमात शेतीचा समावेश केला आहे.

शेतीशाळा हा असाच एक उपक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविला जातो.

सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांत विविध शालेय उपक्रम राबवतात. 

कडेगावमधील अमरामपूर व शिवणीच्या शाळांनी शेतीशाळा उपक्रम राबविला.

शेतीशाळा प्रकल्पातून शाळांमध्ये विविध भाज्यांची लागवड केली आहे. 

शेतीशाळा प्रकल्पातील भाज्या विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह आहारात वापरतात. 

शेतीशाळेत माहितीदर्शक डिजिटल तक्ते लावले आहेत. 

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शेतीचे धडे दिले जातात.

शाळेच्या परिसरात कोरफड, तुळस, बेल, पानफुटी आदी औषधी वनस्पती आहेत.

शेतीशाळा प्रकल्पातून विविध आजारावरील उपाय सांगितले जातात.

सर्व शिक्षक व विद्यार्थी एकत्र येत श्रमप्रतिष्ठा जोपासण्याचा प्रयत्न होतो.