पुण्यातील दत्त मंदिरात भाज्यांची सजावट
शाकंभरी पौर्णिमेनिमित्त पुण्याच्या मंडई परिसरात असलेल्या दत्त मंदिरात भाज्यांची सजावट करण्यात आली आहे.
शाकंभरी ही शाखांची म्हणजेच विविध भाज्या फळे फुले यांची देवी मानली जाते. यानिमित्ताने दत्त मंदिरामध्ये शाखा म्हणजे विविध भाज्यांची सजावट करून दत्त महाराजांना या भाज्यांचा भोग दिला गेला आहे.
याच महिन्यामध्ये निसर्गामध्ये विविध भाज्या फळे फुले उगवतात यामुळे देखील हा भोग देवतांना दिला जातो.
टोमॅटो, बटाटे, पालक, गाजर आणि मटारने सजवलेले मंदिर पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
दत्त महाराजांच्या मंदिरावर लावलेली फुले व फळे भाविकांचे आकर्षण ठरत आहेत.